खंडणी बहाद्दरला पाचोऱ्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:13 IST2019-05-20T18:12:39+5:302019-05-20T18:13:25+5:30
बियर शॉपीत केली तोडफोड

खंडणी बहाद्दरला पाचोऱ्यात अटक
पाचोरा : बियर शॉपी चालवायची असेल तर हप्ता द्यावा लागेल असे म्हणत दुकानाच्या काऊंटरचे नुकसान करून दुकानदारास दमबाजी केल्याप्रकरणी खंडणी बहाद्दरास अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, भडगाव रोड कडील मिलन बियर शॉपी दुकानावर जावून सचिन उर्फ बोचºया रवींद्र पाटील रा. देशमुखवाडी याने बियर बॉक्स घेतला. दुकानदार मनोज साहेबराव सैदाने यांनी बॉक्सचे पैसे मागितले असता मी बॉस आहे तुला दुकान चालवायचे असेल तर ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,असे म्हणत सचिनने काऊंटरला लाथ मारली व गल्ल्यात हात घालून पैसे घेण्याचा प्रयत्न करीत बियर च्या बाटल्या फोडून दुकानदारास शिवीगाळ व दमबाजी केली. याबाबत ेगुन्हा दाखल होवून आरोपीस अटक केली. तपास पीएसआय पंकज शिंदे करीत आहे.