धरणगाव येथे मतदार जागृती दिवसानिमित्त स्पर्धकांनी रेखाटल्या रांगोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 17:48 IST2021-01-25T17:48:01+5:302021-01-25T17:48:36+5:30
मतदार जागृती दिवसानिमित्त प्रांगणात सकाळी ८ ते १० या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

धरणगाव येथे मतदार जागृती दिवसानिमित्त स्पर्धकांनी रेखाटल्या रांगोळ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : येथील तहसील कार्यालयाच्यावतीने मतदार जागृती दिवसानिमित्त प्रांगणात सकाळी ८ ते १० या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
त्यामध्ये प्रथम निकिता प्रवीण पाटील, रोशनी लोटन पाटील, गायत्री अविनाश पाटील, तनुजा विठ्ठल पाटील या विद्यार्थिनींचा रांगोळीला मिळाला. द्वितीय बक्षीस धनश्री सुनील पवार, आदिती सागर गुजर व हर्षदा संजय पवार यांच्या रांगोळीला तर तृतीय बक्षीस तेजल शरद शिंदे, गायत्री शरद बदाणे यांच्या रांगोळीला मिळाले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हास्तरीय उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सचिन पाटील, हिंगोणे. अब्दुल मुतल्लीब अब्दुल गफूर, धरणगाव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुकास्तरावर उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करणारे प्रकाश हरचंद बाविस्कर, पाळधी. समाधान हेमराज पाटील, बिलखेडा. उज्वला रंगराव पाटील, धार. हेमंतकुमार बाळू पाटील, नारणे. रवींद्र बाजीराव मराठे, वाघळूद खु. प्रमोद गोकुळ जाधव, गारखेडा. यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ, दुसरे नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले.