प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झालेले रामेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:44+5:302021-08-17T04:22:44+5:30

दोन शिवलिंग असलेले मंदिर रामायनकालीन हे शिवमंदिर तापी, गिरणा व अंजनी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे. या मंदिराचे ...

Rameshwar who was touched by Lord Rama | प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झालेले रामेश्वर

प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झालेले रामेश्वर

दोन शिवलिंग असलेले मंदिर

रामायनकालीन हे शिवमंदिर तापी, गिरणा व अंजनी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दोन शिवलिंग आहे.

श्रीराम व लक्ष्मण यांच्याहस्ते स्थापना

रामेश्वर मंदिरामध्ये प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांच्याहस्ते शिवलिंगांची स्थापना करण्यात आल्याची अख्यायिका आहे. लाखो वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या दोन शिवलिंगांच्या दर्शनासाठी श्रावण मासात विशेषत: श्रावणातील सोमवारी तसेच महाशिवरात्रीला हजारो भाविक येत असतात. मात्र सध्या कोरोना निर्बंधामुळे या ठिकाणी भाविकांची संख्या कमी आहे.

प्रति प्रयाग

रामायनकालीन ऋषी विश्वामित्र यांनी या ठिकाणी गायत्री यज्ञ केला होता, असे सांगितले जाते. त्यामुळे हे स्थान ऋषी विश्वामित्र यांची तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्रिवेणी संगमावर वसलेल्या या मंदिराला तीर्थक्षेत्र प्रयाग इतके महत्त्व आहे.

Web Title: Rameshwar who was touched by Lord Rama