शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जळगावातील महापालिका रुग्णालयांची सुरक्षा ‘राम भरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 11:57 IST

गेल्या तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक नाही

ठळक मुद्देशिपायांवर सुरक्षेची मदारसहा सुरक्षा रक्षकांची आवश्यकता

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेल्या महापालिकेच्या रुग्णालये व तेथे येणाऱ्या रुग्णांची सुरक्षा वाºयावर आहे. गेल्या तीन वर्षांपासून मनपा रुग्णालयांसाठी सुरक्षा रक्षकच नाही. विशेष म्हणजे त्यासाठी वारंवार मागणी करूनही मनपा प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे.मनपाच्या आर्थिक स्थितीचे कारण पुढे करीत विविध कामांना नकार मिळणे आता शहरवासीयांसाठी नित्याचे झाले आहे. त्यात शहराच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मनपाचे रुग्णालयदेखील सुटलेले नाही.वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची कमतरता असो की इमारतीची दुरवस्था अशा बिकट परिस्थितीत मनपाच्या रुग्णालयांचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात रुग्णालय व रुग्णांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तीनही रुग्णालये वाºयावरशहरात सध्या शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालय, सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता व नानीबाई रुग्णालय असे महापालिकेचे तीन रुग्णालये आहेत. या तीन रुग्णालयांसोबतच पूर्वी शाहू महाराज रुग्णालयात हेदेखील मनपाचे मोठे रुग्णालय होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरक्षा रक्षकांच्या ठेक्याची मुदत संपली व रुग्णालयांना त्यानंतर सुरक्षा रक्षक मिळालेच नाही. तेव्हापासून ही रुग्णालये वाºयावर आहे. यातील शाहू महाराज रुग्णालय आता मनपाकडे नसले तरी ते हस्तांतरीत करण्यापूर्वी दर महिन्याला १५० ते १७५ प्रसूती होणाºया या रुग्णालयातही साधारण दोन वर्षे सुरक्षा रक्षक नव्हते.रुग्णांच्या सुरक्षेचे काय ?चेतनदास मेहता रुग्णालय व नानीबाई रुग्णालय या ठिकाणी केवळ ओपीडी चालते. मात्र शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालयात प्रसूतीदेखील होतात. त्यामुळे या रुग्णालयात सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे. अत्यंत गजबजलेल्या परिसरात असलेल्या व सतत वर्दळ असणाºया जिल्हा रुग्णालयातून एक महिन्याचे बाळ पळवून नेल्याची घटना घडली होती तरीदेखील मनपा त्यापासून काही बोध घेत नाही का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. येथे नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रुग्णांमधून होत आहे. रुग्णांसोबतच रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न असला तरी मनपाने ही रुग्णालये वाºयावर सोडून दिली आहे का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.सहा सुरक्षा रक्षकांची आवश्यकताशिवाजीनगरातील डी.बी. जैन या एकाच रुग्णालयाचा विचार केला तर येथे सहा सुरक्षा रक्षकांची आवश्यता असल्याचे सांगितले जात आहे. एका पाळीमध्ये (शिफ्ट) किमान दोन सुरक्षा रक्षक या ठिकाणी आवश्यक आहे.शिपायांना करावी लागतात सुरक्षा रक्षकाची कामेसुरक्षा रक्षक नसल्याने डी.बी. जैन रुग्णालयातील शिपायांवरच रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असून ते शिपायांच्या कामासह सुरक्षा रक्षकाचीही कामे पाहतात. शिपायांची कामे करीत असताना रुग्णालय परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास काय करणार, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.रुग्णालयासाठी सुरक्षा रक्षक मिळण्याबाबत वरिष्ठांकडे कळविण्यात येऊन तशी मागणीही करण्यात आली. मात्र अद्याप सुरक्षा रक्षक मिळालेले नाही.- डॉ. राम रावलानी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा रुग्णालय.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव