राहुल गांधींची सभा आटोपून परतणाऱ्यांच्या दिशेने गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:33 IST2019-03-03T03:32:59+5:302019-03-03T03:33:07+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळे येथील सभा आटोपून घरी परतणाऱ्या भुसावळ येथील कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता राष्टÑीय महामार्गावरील पाळधी (ता. धरणगावनजीक) ढाब्यावर घडली.

राहुल गांधींची सभा आटोपून परतणाऱ्यांच्या दिशेने गोळीबार
जळगाव : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळे येथील सभा आटोपून घरी परतणाऱ्या भुसावळ येथील कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी (ता. धरणगावनजीक) ढाब्यावर घडली. दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल व चार काडतूसे जप्त केली आहेत.
आकाश सुरेश सपकाळे (२१) व विशाल लालचंद हरदे (२२, रा. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत. सभेला उपस्थित राहून भुसावळ येथील सहा ते सात कार्यकर्ते मोटारीने परतत होते. हे सर्व जण ढाब्यावर जेवणासाठी थांबले. तेथे दोघांनी त्यांच्याशी वाद घातला आणि गावठी पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला.