चोपडा येथे नागरिकत्व विधेयक समर्थनार्थ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 19:17 IST2020-02-03T19:16:14+5:302020-02-03T19:17:16+5:30

नागरिकत्व कायदा समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंच व संविधान सन्मान समितीमार्फत अभूतपूर्व रॅली काढण्यात आली.

Rally in Chopda in support of Citizenship Bill | चोपडा येथे नागरिकत्व विधेयक समर्थनार्थ रॅली

चोपडा येथे नागरिकत्व विधेयक समर्थनार्थ रॅली

ठळक मुद्देघोषणाबाजीने दणाणले शहररॅलीच्या मार्गावरून विविध घोषणा

चोपडा, जि.जळगाव : नागरिकत्व कायदा समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंच व संविधान सन्मान समितीमार्फत अभूतपूर्व रॅली काढण्यात आली.
शासकीय विश्रामगृहापासून रॅलीला प्रारंभ झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाने नाट्यगृहाजवळ रॅलीचा समारोप झाला.
रॅलीत विद्यार्थी, राजकीय पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, महिला, महाविद्यालयीन युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील दुकाने व्यापारी बंधूनी दुपारी बारापर्यंत बंद ठेवली होती. निवेदन तहसीलदार अनिल गावीत यांना देण्यात आले.
घोषणाबाजीने दणाणले शहर
रॅलीच्या मार्गावरून सहभागी झालेले राष्ट्रप्रेमी नागरिक विविध घोषणा देवून उत्साह निर्माण करीत होते. सव्वा तास चाललेल्या या रॅलीने चोपडा शहर दणाणून गेले होते.
समारोपप्रसंगी झालेल्या सभेत जि.प.चे माजी सदस्य शांताराम पाटील, दिलीप नेवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक धरणगावचे महेश अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौरभ नेवे यांनी केले. आभार प्रदर्शन निमंत्रक गोपाल पाटील व सहनिमंत्रक मनोज विसावे यांनी केले.

Web Title: Rally in Chopda in support of Citizenship Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.