अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेधार्थ खान्देशात ठिकठिकाणी मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 12:48 IST2018-02-20T12:46:25+5:302018-02-20T12:48:09+5:30

आरोपीला अटक करण्याची मागणी

A rally against minor girl case | अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेधार्थ खान्देशात ठिकठिकाणी मोर्चे

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेधार्थ खान्देशात ठिकठिकाणी मोर्चे

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव/चोपडा/दोंडाईचा, दि. २० - दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिकणा-या पाच वर्षीय मुलीवर लैंगिग अत्याचार करणा-या मुख्य आरोपीला त्वरीत अटक करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, चोपडा तसेच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मोर्चा काढण्यात आला.
चाळीसगाव येथे समस्त तेली समाजातर्फे सकाळी १० वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. मुलींच्याहस्ते निषेधासह आरोपीस अटक करण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.
महावीर व्यायाम शाळेपासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी घाट, छोटी गुजरी मार्गे मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकला. येथे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील व तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस अटकेची मागणी करण्यात आली. निवेदनावर दिलीप रामराव चौधरी, राजेंद्र चौधरी, आर.डी.चौधरी, बाळासाहेब चौधरी बा.नि. पवार यांच्यासह शंभरहून अधिक समाजबांधवांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: A rally against minor girl case

टॅग्स :Jalgaonजळगाव