रक्षा खडसे, गुलाबराव देवकर कोट्यधीश उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:05 IST2019-03-29T12:04:45+5:302019-03-29T12:05:44+5:30
जळगाव,रावेर लोकसभा मतदार संघ :दोघेही शिक्षित उमेदवार

रक्षा खडसे, गुलाबराव देवकर कोट्यधीश उमेदवार
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे व जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून उमेदवारी दाखल करणारे उमेदवार गुलाबराव देवकर हे दोघेही कोट्यधीश उमेदवार असल्याचे त्यांनी उमेदवारीबरोबर दाखल केलेल्या सांपत्तिक स्थितीच्या विवरणावरून लक्षात येते.
जळगाव लोकसभा मतदार संघातून गुरूवारी भाजपातर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून या मतदार संघाच्या विद्यमान आमदार रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसने उमेदवारी दिलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सांपत्तीक स्थितीत वाढ
दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दोन्ही उमेदवारांनी आपल्या सांपत्तीक स्थितीबाबतचा तपशिल १०० रूपयांच्या स्टॅँप पेपरवर प्रतिज्ञापत्राद्वारे दिला आहे. रक्षा खडसे यांची जंगम मालमत्ता ४५ कोटी ७० लाख ३५ हजार ३३३ एवढी जंगल मालमत्ता आहे. तर ३ कोटी ९ लाख २ हजार ९५ एवढी स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. विविध प्रकारची आर्थिक गुंतवणूक, रोकड अशा सांपत्तिक स्थितीत चढ उतार असल्याचे लक्षात येते. पाच वर्षाच्या सांपत्तीक स्थितीच्या विवरणात वर्षाचे उत्पन्न सन २०१३- १४- २७,६०,०७३, २०१४-१५ मध्ये ८८,२६,००३, २०१५-१६ मध्ये १,१६,०२,४६६, २०१६-१७ मध्ये १,०९,४५,१२२, २०१७-१८ मध्ये ८७,५५,३२३ रूपये अशी होती.
देवकरही कोट्यधीश
जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या गुलाबराव देवकर यांचे शिक्षण पी.डी. कॉमर्स असे आहे. दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत: व पत्नीच्या नावाने असलेल्या संपत्तीचे विवरण त्यांनी दिले आहे.
देवकर यांच्या व पत्नीच्या नावावे जंगम मालमत्ता १ कोटी ३३ लाख ५२ हजार ५१७ एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता ३ कोटी ७३ लाख आहे. वैयक्तीक उत्पन्न व सांपत्तीक स्थितीबाबतच्या वितरणात वर्षनिहाय वाढ झाल्याचेच लक्षात येते. यात २०१३ -१४ मध्ये २,५१,७७४, २०१४-१५ मध्ये ३,०१,८९६, २०१५-१६ मध्ये ६,८६,६५०, २०१६-१७ मध्ये १८,२४,४२० तर २०१७-१८ मध्ये ७,५१,११६ रूपये असे ’उपन्न होते.
देवकरांवर कर्जाची जबाबदारी
रावेर लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवित असलेल्या रक्षा खडसे या उच्च शिक्षीत उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर कोणतेही कर्ज नाही. तसेच गुन्हाही दाखल नाही. जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या व पत्नीच्या नावे ८५,५२,६६७ रूपये एवढे कर्ज आहे. देवकरांविरोधात मात्र दोन गुन्हे दाखल आहेत.