जळगाव- युथ फॉर हेल्प फाऊंडेशनने 'एक राखी माझ्या सैनिक भावासाठी'.. हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सेवा बजावणाºया सैनिक भावांपर्यंत जळगावकरांच्या भावना पोहचिल्या जाणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील भगिनींनी राखी किंवा संदेशपर पत्रे युथ फॉर हेल्प फाऊंडेशनकडे पाठविण्याचे आवाहन फाउंडेश्नचे चेतन वाणी यांनी केले आहे.सिमेवर लढा देणाºया सैनिक भावांना जळगावकर भगिनींच्या प्रेमाचा ओलावा आणि आपुलकीचा संदेश असलेल्या प्रार्थना मिळाव्या यासाठी युथ फॉर हेल्प फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. गुरूवार, २३ आॅगस्टपर्यंत राख्या, शुभेच्छा पत्रे युथ फॉर हेल्प फाऊंडेशनच्या १, पहिला माळा, कालिदास चेंबर, प्रताप नगर या पत्त्यावर किंवा रॉबीन लुल्ला - विजय इलेक्ट्रॉनिक्स, दु.क्र.४,५ गोलाणी मार्केट, जळगाव तसेच जकी अहमद - के लाँज, ग्राऊंड फ्लोअर, खान्देश सेंट्रल मॉल, जळगाव येथे पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
एक राखी सैनिक भावांसाठी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:50 IST
युथ फॉर हेल्प फाऊंडेशनने 'एक राखी माझ्या सैनिक भावासाठी'.. हा उपक्रम हाती घेतला आहे.
एक राखी सैनिक भावांसाठी उपक्रम
ठळक मुद्देराख्या, पत्रे पाठविण्याचे आवाहनसैनिकांपर्यंत पोहचविणार जळगावकरांच्या भावनायुथ फॉर हेल्प फाऊंडेशनचा उपक्रम