वाहून गेलेल्या राजेंद्रचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: October 4, 2016 10:11 IST2016-10-04T10:11:54+5:302016-10-04T10:11:54+5:30

चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे येथे तितुर नदीपुलावरुन सोमवारी रात्री वाहून गेलेल्या राजेंद्र मधुकर पाटील (वय ३५ ) याचा मृतदेह सापडला आहे.

Rajendra's body was found | वाहून गेलेल्या राजेंद्रचा मृतदेह आढळला

वाहून गेलेल्या राजेंद्रचा मृतदेह आढळला

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे येथे तितुर नदीपुलावरुन सोमवारी रात्री साडेआठ वाजता वाहून गेलेल्या राजेंद्र  मधुकर पाटील (वय ३५ ) याचा मृतदेह ४ रोजी मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता तांबोळे गावापासून एक किमी अंतरावर चाळीसगावकडे विटभट्टी जवळ आढळला.
दरम्यान ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी सहकार्यासह रात्री १२ पर्यंत शोध मोहीम राबविली. रात्री उशिरा पर्यंत या मार्गावरील वाहतुकही थांबवली होती. मंगळवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार सोनवणे, पोलिस कर्मचारी, गावकरी उपस्थित होते..मृतदेह ग्रामीण  रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
मृत राजेंद्र यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे..राजेंद्र हा एकुलता एक असल्याने आई-वडिलांचा आधार हरविला आहे. तांबोळे परिसरात दुःखद घटनेविषयी हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title: Rajendra's body was found