चहार्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:40+5:302021-06-02T04:14:40+5:30

चोपडा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी पदावरून ते सेवानिवृत्त झाले. राजेंद्र रायसिंग यांनी जळगाव येथील जात पडताळणी कार्यालयात डीवायएसपीपदी, नागपूर, ...

Rajendra Raising, Sub-Divisional Police Officer, Chahardi, retired | चहार्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग सेवानिवृत्त

चहार्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग सेवानिवृत्त

चोपडा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी पदावरून ते सेवानिवृत्त झाले. राजेंद्र रायसिंग यांनी जळगाव येथील जात पडताळणी कार्यालयात डीवायएसपीपदी, नागपूर, पुणे, मुंबई, मालेगाव, धुळे, नंदूरबार,जळगाव या जिल्ह्यात सेवा केली. राजेंद्र रायसिंग यांनी यापूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून जळगाव येथे रामानंद नगर पोलीस स्टेशन, यावल पोलीस स्टेशन, शिरपूर पोलीस स्टेशन, नवापूर पोलीस स्टेशन आणि शहादा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी पदावर काम केले आहे. त्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी नेमका स्वत:चा तालुका चोपडा मिळाल्याने त्यांची सेवा समाप्त झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. त्यांचे मूळ गाव चहार्डी असून, ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, साखर कारखान्याचे संचालक व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आनंदराव रायसिंग यांचे ते लहान बंधू आहेत.

===Photopath===

010621\01jal_17_01062021_12.jpg

===Caption===

राजेंद्र शंकरराव रायसिंग

Web Title: Rajendra Raising, Sub-Divisional Police Officer, Chahardi, retired