शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी वरुणराजाला साकडे, काढण्यात येताय धोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 10:10 IST

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अर्पण लोढावाकोद, ता. जामनेर : वाकोदसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गासह मजूर वर्गाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. वाकोद येथे वरूणराजाला साकडे घालण्यासाठी पूर्वकालीन चालत आलेली प्रथा जोपासत धोंडी - धोंडी पाणी दे, साय माय पीकू दे म्हणत गावातून परमेश्वराला साकडे घालण्यात आले.पावसाची दडी, पिकांची शेवटची घटकागेल्या अनेक वर्षापासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल या आशेने बी-बियाणे व खताची जुळवाजुळव केली. पावसानेही थोड्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी पेरते झाले होते. मात्र पेरणी केलेली पिके बऱ्यापैकी अंकुरले असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजताना दिसत आहेत.रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ह्यधोंडी धोंडी पाणी देङ्घपावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. दरम्यान, वाकोदसह परिसरात पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे याकरिता रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ह्यधोंडी धोंडी पाणी देह्ण म्हणत वरुणराजाला साकडं घातलं जात आहे.दुबार पेरणीचे संकटमान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र नंतर पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्यानं बऱ्यापैकी पेरण्या पूर्ण झाल्या नसून, तर काही ठिकाणी मात्र पावसाअभावी पिकं शेवटच्या घटका मोजत असून, ऑक्सीजनवर आहेत. पावसाअभावी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांना पेरता येईना तर काहींना पिकं जळून जाण्याची भीती आहे. 

टॅग्स :RainपाऊसJamnerजामनेर