पावसाने सारेच सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:35 IST2020-07-15T23:34:27+5:302020-07-15T23:35:08+5:30

ढगाळ वातावरण कायम

The rain dried up | पावसाने सारेच सुखावले

पावसाने सारेच सुखावले

जळगाव : बहुप्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी जोरदार पाऊस होऊन सर्वच जण सुखावले. तब्बल पाऊण तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. आल्हाददायक वातावरण घेऊन आलेल्या बुधवारच्या सकाळने सर्वच जण सुखावले. दुपारी पावसाने उघडीप दिली तरी ढगाळ वातावरण कायम होते.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा होऊन पाऊस येणार असे सर्वांनाच वाटत होते. इतकेच नव्हे तर अनेक वेळा ढगाळ वातावरण होऊन पावसाचा शिडकावही झाला. मात्र दमदार पाऊस न होता वारंवार पावसाने दडी मारली. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होऊन गार वारा सुटला. काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला एक-दीड तास मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असताना सकाळी साडे दहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली.

Web Title: The rain dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव