शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भुसावळात रेल्वे पादचारी पुलाचे काम कासव गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 6:09 PM

ब्रिटिशकालीन पादचारी पूल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाडण्यात आला होता. तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता एक वर्ष उलटले तरीही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये पुलाचे काम पूर्ण करण्याची संधीकामाला गती देण्याची आवश्यकता

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : रेल्वेस्थानकावरील मुख्य प्रवेशद्वाराकडील स्वयंचलित जिल्ह्याला लागून असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाडण्यात आला होता. तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता एक वर्ष उलटले तरीही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. लॉकडाऊनमध्ये पुलाचे कार्य पूर्ण करण्याची संधी आहे.मुंबई येथे रेल्वेचा पादचारी पूल पडल्यानंतर मोठा अपघात झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे एप्रिल २०१९ ला रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वाराकडील स्वयंचलित जिन्याला लागून असलेले ब्रिटिशकालीन पादचारी पूल फलाट १-८ पर्यंत जोडले गेले होते. जीर्ण पुलाचा धोका नको म्हणून रेल्वे प्रशासनाने पूल जमीनदोस्त केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात पुलाची पुनर्बांधणी करण्यात येईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरीही पुलाचे काम थंडबस्त्यात आहे.स्वयंचलित जिने पुलाअभावी ठरताय शोपीसरेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पुलावर जाण्याकरिता जिन्याला लागून स्वयंचलित जिना तयार करण्यात आला होता व यावरून थेट जुन्या पुलावरून फलाट १ ते ८ पर्यंत जाण्यासाठी सोयीचे होते. मात्र जुना पूल पडल्यामुळे स्वयंचलित जिने फक्त शोपीस ठरत आहेत.लॉकडाऊनमुळे पुलाचे कार्य करण्याची संधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून प्रवासी रेल्वे बंद आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला कोणतीही तांत्रिक अडचण नाही. या काळात रेल्वेला तांत्रिक अडचणी नाही. यामुळे लवकरात लवकर पुलाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.रॅम्पवरून मारावा लागतो फेराजुना पादचारी पूल जमीनदोस्त झाल्यामुळे व स्वयंचलित जिनेही बंद असल्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराकडून फलाटांवर जायचे असल्यास प्रवाशांना मोठा फेरा मारून जावे लागते. जुन्या पुलावरून अवघ्या काही मिनिटातच सरळ मुख्य प्रवेशद्वाराकडून तर फलाट ८ पर्यंत जाण्याची सोय होती.

 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ