भुसावळ : रेल्वे विभागात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. आजची परिस्थिती लक्षात घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इंटरनेटच्या माध्यमातून सकाळी सात वाजता योगसत्र घेण्यात आले. डीआरएम विवेककुमार गुप्ता, रेल्वे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच परिवारातील सदस्य यांनी मोठ्या संख्येने आॅनलाईन सहभाग नोंदविला.योग साधना घरूनच केली. आॅनलाईन योगसत्रात योग साधनेचे प्रात्यक्षिक योग शिक्षक एन.पी.परदेशी यांनी सादर केले. सूत्रसंचालन सतीश कुळकर्णी व संतोष उपाध्याययांनी केले.त्यात प्रत्येक आसनाची माहिती आणि लाभ याची माहिती विशद केली. या कार्यक्रमासाठी रेल्वे स्कूल उपप्राचार्या स्वाती चतुर्वेदी, कलाशिक्षक आर. पी. जावळे, शिक्षकेतर कर्मचारी, देवेंद्र विश्वकर्मा, डीबीए आणि सहकारी यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन एन.डी.गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रम् यशस्वितेसाठी कार्मिक शाखा भुसावळ येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
भुसावळात रेल्वे प्रशासनाने केला आॅनलाईन योगाभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 15:55 IST