जुगार अड्ड्यावर धाड ; आठ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:47 IST2021-02-20T04:47:04+5:302021-02-20T04:47:04+5:30

जळगाव :रामेश्वर कॉलनीतील मेहरूण बांधाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी धाड टाकली. त्यात आठ जणांना ताब्यात ...

Raids on gambling dens; Eight people were detained | जुगार अड्ड्यावर धाड ; आठ जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर धाड ; आठ जण ताब्यात

जळगाव :रामेश्वर कॉलनीतील मेहरूण बांधाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी धाड टाकली. त्यात आठ जणांना ताब्यात घेण्यात असून त्यांच्याकडून ७६ हजार ७३५ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ईश्‍वर उर्फ बाळू जगन्नाथ इंगळे (कोळी) रा. रामेश्वर कॉलनी हा पत्ते खेळवित असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने धाड टाकली. ईश्‍वर श्रावण महाजन,दीपक मनोहर देशमुख, राजेंद्र रामदास खुरपडे (वंजारी), अर्जुन नथ्थू सोनवणे, योगेश रतन कोळी, सागर दिलीप सोनवणे, दत्तू सुपडू पाटील व ईश्‍वर उर्फ बाळू जगन्नाथ इंगळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raids on gambling dens; Eight people were detained