समता नगर, हरीविठ्ठल नगरात दारू अड्ड्यांवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:16 IST2021-05-07T04:16:47+5:302021-05-07T04:16:47+5:30

जळगाव : समता नगर व हरिविठ्ठल नगरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई करीत तीन जणांकडून ...

Raid on liquor dens in Samata Nagar, Harivittal Nagar | समता नगर, हरीविठ्ठल नगरात दारू अड्ड्यांवर धाड

समता नगर, हरीविठ्ठल नगरात दारू अड्ड्यांवर धाड

जळगाव : समता नगर व हरिविठ्ठल नगरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई करीत तीन जणांकडून २ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समता नगर आणि हरीविठ्ठल नगरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. त्यानुसार तीन ठिकाणी छापा मारून २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात महेंद्र सुरेश राणे (वय ४६, रा. समता नगर) याच्याकडून १ हजार ७५० रुपये किमतीची ३५ लीटर गावठी दारू, विशाल अरुण गारूंगे याच्याकडून २५० रुपये किमतीची ५ लीटर गावठी दारू आणि लक्ष्मी भानुदास बाडगे (रा. हरीविठ्ठल नगर) हिच्याकडून ९०० रुपये किमतीची १८ लीटर गावठी दारू अशी एकूण २ हजार ९०० रुपये किमतीची गावठी दारू हस्तगत केली. तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात पो. कॉ. संजय तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहेत.

Web Title: Raid on liquor dens in Samata Nagar, Harivittal Nagar