दूरचित्रवाणी मालिकेतून घरा-घरात पोहचलेल्या ‘राधिका’ने काढल्या जळगावकर महिलांसोबत महिलांसोबत आनंदाने सेल्फी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 17:20 IST2017-10-01T12:54:58+5:302017-10-01T17:20:07+5:30
विजयानिमित्त जळगावात अभिनेत्री अनिता दाते यांच्याहस्ते 100 जणांना अन्नदान

दूरचित्रवाणी मालिकेतून घरा-घरात पोहचलेल्या ‘राधिका’ने काढल्या जळगावकर महिलांसोबत महिलांसोबत आनंदाने सेल्फी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - ‘माङया नव:याची बायको’ मालिका फेम अभिनेत्री अनिता दाते यांच्याहस्ते विजयादशमीनिमित्त जळगावात 100 गरजूंना अन्नदान करण्यात आले. यावेळी त्यांनी जळगावकर महिला-तरुणींसोबत आनंदाने सेल्फी काढल्या.
जळगाव जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सेवालय उपक्रमांतर्गत दररोज गरजूंना मोफत अन्नदान केले जाते. त्यात शनिवारी विजयादशमीनिमित्त अनिता दाते यांना निमंत्रित केले होते. त्यात अनिताने मोठय़ा आनंद व उत्साहाने गरजूंना अन्नदान केले. यावेळी रा.स्व.संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक घाणेकर, संदीप कासार, विनोद कोळी, पगार महाशब्दे, आर.सी. चौधरी, मंगला पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.