जळगावात बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:12 IST2018-08-24T20:06:38+5:302018-08-24T20:12:42+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करावे, अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व शेतकºयांच्या उपस्थितीत तहसीलदार अमोल निकम यांना दिले.

जळगावात बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करा
जळगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करावे, अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व शेतकºयांच्या उपस्थितीत तहसीलदार अमोल निकम यांना दिले.
कापूस पिकांवर बोंडअळीच्या प्रादुर्भावमुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहिर केली मात्र तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. तसेच पिक विम्याची रक्कम भरून देखील नुकसानग्रस्त शेतकºयांना मिळालेली नाही. येत्या आठ दिवसात बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान वितरीत करावे, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला. यावेळी मजूर फेडरेशन सभापती लिलाधर तायडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, किसान सेलचे तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, ओबीसी सेलचे मधुकर पाटील , शेतकी संघाचे संचालक गोकुळ चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.