शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

शालेय अभ्यासक्रमांच्या सर्व पुस्तकात ‘क्यू.आर.’ कोड, आता वर्गात शिक्षकांना भ्रमणध्वनी गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:07 PM

अभ्यासक्रमात झाला कृतीयुक्त बदल

ठळक मुद्देक्यू.आर. कोडने प्रशिक्षणात हजेरीक्यू.आर. कोड स्कॅन करून हजेरी नोंदविण्याचा राज्यातील पहिला प्रयोग अमळनेरात

संजय पाटील / आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १३ - बदललेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनाही तंत्रस्नेही व्हावे लागणार असून सर्व इयत्तेच्या सर्व विषयांच्या पुस्तकात क्यू.आर. कोडचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार शिक्षकांना भ्रमणध्वनी गरजेचा झाला आहे.शासनाने गेल्या वर्षांपासून एक एक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलणे सुरू केले असून यंदा दहावी, आठवीची पुस्तके बदलण्यात आली आहेत. कृतीयुक्त स्वयं अध्ययनवर भर देण्यात आला असून तालुका पातळीवर शिक्षकांना अध्ययन व अध्यापन याविषयी राज्यपातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहेत. यामुळे शिक्षकांनाही आधुनिक तसेच कृतीयुक्त व तंत्रस्नेही व्हावे लागणार आहेअमळनेर येथील तालुका पातळीवर गणित प्रशिक्षणात शिक्षकांची प्रथमच क्यू.आर. कोड भ्रमाणध्वनीवरून स्कॅन करून हजेरी नोंदविण्यात आली. गणित सुलभक डी. ए. धनगर यांनी क्यू.आर. कोड जनरेट केला होता. तालुका पातळीवरील हा राज्यात पहिला प्रयोग होता. हजेरीच्या माध्यमातूनच शिक्षकांना याद्वारे तंत्रस्नेही करण्याचा प्रयत्न झाला.भ्रमणध्वनी न वापरण्याचा नियम शिथिल करावा लागणारक्यू.आर. कोड स्कॅन केल्यानंतर त्या त्या विषयाच्या विविध लिंक ओपन होऊन पुस्तकाव्यतिरिक्त सर्व माहिती उपलब्ध होते. त्यामुळे शिक्षकांना भ्रमणध्वनी वर्गात शिकवताना वापरवाच लागेल व शिक्षकांना संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आणि अतिरिक्त माहिती मिळून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास उपयोगी ठरणार आहे. यामुळे शिक्षकांना वर्गामध्ये भ्रमणध्वनी वापरू नका हा नियम शिथिल करावा लागणार असून भ्रमणध्वनी आवश्यक झाले असून वर्गात शिकविताना अतिरिक्त ज्ञानासाठी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून क्यू.आर.कोड चा वापर करावा लागणार आहे. अनेक शिक्षक अद्याप कोड स्कॅनर बाबत अनभिज्ञ आहेत.अमळनेर तालुका प्रशिक्षणात राज्य पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शक डी. ए. धनगर, संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. महाजन, विषय तज्ज्ञ प्रमोद पुनवटकर, वानखेडे यांनीही मार्गदर्शन केले. नव्या अभ्यासक्रमात शासनाने जीएसटी कर लागू केल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच दहावी गणितात जीएसटी प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नेमका जीएसटी काय आहे हे सर्वांना सविस्तर कळणार आहे. शिबिरास मुख्यध्यापक सतीश देशमुख, मुख्याध्यापक अनिता बोरसे, मुख्यअध्यपक राजेंद्र पाटील , मुख्यअध्यापक आर.पी. मुसळे , बेहरे, पी. डी. पाटील, के.यू. बागूल, निरंजन पेंढारे, सुनील पाटील, दीपक महाजन, गोपाळ हडपे, ए. पी. वाणी, आर. ए. शिंदे हजर होते.

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव