भुसावळसह रेल्वे स्थानकांचे फलक उर्दू भाषेत लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:19 IST2018-01-09T19:14:34+5:302018-01-09T19:19:37+5:30
हिंदू-मुस्लीम बांधवांनी सादर केले रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना निवेदन

भुसावळसह रेल्वे स्थानकांचे फलक उर्दू भाषेत लावा
ठळक मुद्देभुसावळसह सर्व रेल्वे स्टेशनचे फलक उर्दू भाषेत लावाहिंदू-मुस्लीम बांधवांनी घेतली रेल्वे सरव्यवस्थापकांची भेटआपल्या मागण्यांचे दिने सरव्यवस्थापकांना निवेदन
आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.९ : भुसावळसह इतर रेल्वे स्थानकांच्या फलकावर उर्दू भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी हिंदू - मुस्लिम समाजातर्फे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्याकडे करण्यात आली. नगरसेवक हाजी मुन्ना तेली, हाजी सलीम नादर पिंजारी,माजी नगरसेवक हाजी साबीर शेख, साहित्यिक अहमद कलीम, कवी हामीद भुसावली,अॅड.हुमायू रशीद, डॉ.एजाज खान, नसीम तडवी, कैलास उपाध्याय, शंकर झुंगारेकर, सलाऊद्दीन आदीब आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. प्रसंगी भुसावळचे डीआरएम आर.के.यादव उपस्थित होते.