शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीला पूर; जळगाव जामोद, संग्रामपूरचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 20:36 IST

Jalgaon : जळगाव जामोद येथून बुलढाणा, अकोला आणि शेगाव जाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले. या दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटला आहे. 

जळगाव जामोद : रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा नदीला मोठा पूर आला असून त्यामुळे जळगाव जामोद-नांदुरा वाहतूक सोमवारी दुपारी पाच वाजतापासून बंद झाली. तर जळगाव जामोद-संग्रामपूर- शेगाव मार्ग कालखेड जवळ असलेल्या नाल्याला पूर असल्यामुळे सकाळपासूनच बंद आहे. जळगाव जामोद येथून बुलढाणा, अकोला आणि शेगाव जाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले. या दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटला आहे. 

जळगाव नांदुरा मार्गावरील मानेगाव येथे पूर्णा नदीच्या पुलावर बांधलेला पूल गेल्या चार वर्षापासून शोभेची वस्तू बनला आहे. दरवर्षी प्रवाशांना वाटते या पावसाळ्यात तरी हा पूल चालू होईल. परंतु अद्यापही हा पूल सुरू होण्याचा झालेला नाही. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला म्हणजे इंग्रजकालीन पूल पुराखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते. हिच परिस्थिती सोमवारी निर्माण झाली आहे. प्रवाशांना अकोला किंवा बुलढाणा जायचे असल्यास मुक्ताईनगर मलकापूर मार्गे जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना प्रवास भाड्याचा आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागतो. पूर्णा नदीला पुलावरून पाणी असताना कोणीही वाहनधारक त्यावरून जाऊ नये, यासाठी पुलावर जळगाव जामोद पोलिसांच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे.

रूग्ण महिलेला बैलगाडीचा आधार, टाकळीपंच संपर्क तुटला! पातुर्डा : जवळच्या टाकळीपंच येथील मोरवा नाल्याच्या पुलावरून पाणी असल्याने या पूर्णाकाठच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे. रात्री उशीरापर्यत पाणी उतरले नव्हते. सोमवारी पातुर्डा येथे आठवडी बाजार असतो. नागरिकांना बाजारात येता आले नाही. या दरम्यान रूग्णांना त्रास झाला. गावातील शीला झाडोकार यांना अचानक दुखण्याचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना बैलगाडीतून शेत रस्त्याने कोद्री मार्गे पातुर्डा येथे दवाखान्यात न्यावे लागले. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे दिसून आले. पूर्णा नदीला पुर वाढण्याची परिस्थीती असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊसriverनदी