पाणीपुरवठ्यासाठी कंडारी गावात केली थेट ग्रामसेवकाची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:50 IST2019-04-02T12:50:44+5:302019-04-02T12:50:56+5:30

पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

Pump of Gramsevak directly in Kandari village for water supply | पाणीपुरवठ्यासाठी कंडारी गावात केली थेट ग्रामसेवकाची पूजा

पाणीपुरवठ्यासाठी कंडारी गावात केली थेट ग्रामसेवकाची पूजा

भुसावळ, जि. जळगाव - तालुक्यातील कंडारी येथे पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये जावून थेट ग्रामसेवक बारेला यांची पूजा करून वार्ड क्रमांक चारमध्ये पाणी मिळावे, अशी मागणी केली.
पंचायत समिती व ग्रामपंचाय प्रशासनास वार्ड क्रमांक चारमध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लावता आला नाही, त्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी गावातील संजय मोरे यांनी ग्रामपंचायतमध्ये पोहचून ग्रामसेवकाची पूजा करीत या भागात नियमित पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केली.

Web Title: Pump of Gramsevak directly in Kandari village for water supply

टॅग्स :Jalgaonजळगाव