जळगाव : भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीच्या वतीने नुकताच माजी कुलगुरू पी.पी. पाटील यांच्या निवासस्थानी वर्षा अहिरराव लिखित निवडक निबंध भाग- ३ च्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी, संयोजक विजय लुल्हे, कलाशिक्षक सुनील दाभाडे यांची उपस्थिती होती.
चित्रकार दाभाडे यांनी तव्यावर रेखाटलेल्या सुप्रसिद्ध बहिणाबाईंची कविता ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर’चे सृजनशील शब्द रेखाटन केलेल्या सचित्र पेंटिंगचे माजी कुलगुरू पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी नीळकंठ गायकवाड, सुप्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, प्रशांत पब्लिकेशन्सचे रंगराव पाटील, विजया अहिरराव, प्रसाद अहिरराव यांनी मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी उषा सोनार, विशाखा देशमुख, कवी अरुण वांद्रे, महेश बच्छाव, मुख्याध्यापक मनोहर खोंडे, सुनील महाजन,प्रशांत पाटील, दीपक पाटील, सुनील महाजन यांनी सहकार्य केले.
फोटो कॅप्शन : पुस्तक प्रकाशन करतांना माजी कुलगुरू पी.पी.पाटील,सिद्धार्थ नेतकर, विजय लुल्हे, सुनील दाभाडे, संगीता माळी, वर्षा अहिरराव आदी.