प्रभारी प्र-कुलगुरू पदाचा तात्पुरता पदभार द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:04+5:302021-04-06T04:16:04+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे त्यांच्या जागी तात्पुरत्या स्वरुपात पदभार ...

प्रभारी प्र-कुलगुरू पदाचा तात्पुरता पदभार द्यावा
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे त्यांच्या जागी तात्पुरत्या स्वरुपात पदभार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रभारी कुलगुरूंकडे करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विद्यापीठातही अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रभारी प्र-कुलगुरू व प्रभारी कुलसचिव यांचाही अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रभारी कुलसचिव उपचार घेत असल्यामुळे त्यांच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात इतर योग्य व्यक्तीकडे पदभार सोपविण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्र-कुलगुरू यांच्या पदभारही इतर व्यक्तीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. तसेच प्र-कुलगुरू नसल्यामुळे त्यांच्या कामाची जबाबदारी कुणाकडे सोपविण्यात आली आहे, याची माहिती जाहीर करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.