शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा साहित्य चोरीप्रकरणी प्राध्यापक निलंबित

By admin | Updated: June 21, 2014 16:19 IST

प्रताप महाविद्यालयातील क्रीडा साहित्य चोरीप्रकरणी प्रा. अमृत अग्रवाल यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

अमळनेर : प्रताप महाविद्यालयातील क्रीडा साहित्य चोरीप्रकरणी प्रा. अमृत अग्रवाल यांना निलंबित करण्यात आले आहे. याव्यतिरक्ति तीन संचालकांना शाळा समिती चेअरमन पदावरून व कार्यउपाध्यक्ष पदावरून एका संचालकाला पायउतार करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नवीन समिती नेमण्यात येणार आहे.
शहरातील नामांकित प्रताप महाविद्यालयात क्रीडा साहित्य चोरी करताना प्रा.अमृत अग्रवाल यांना प्राचार्य एल.ए. पाटील यांनी रंगेहाथ पकडले होते. १0 जून रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी मोठाच वाद निर्माण झाला. या पार्श्‍वभूमीवर आज खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारी मंडळाची बंद सभागृहात सभा झाली. यात क्रीडा साहित्य चोरीचा मुद्दा चांगलाच गाजला. सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अध्यक्षस्थानी खा.शि.चे कार्याध्यक्ष गोविंद मुंदडे होते. 
चोरीची बातमी माध्यमांमध्ये आल्याने सत्ताधार्‍यांनी प्राचार्यांवरही रोष व्यक्त केला. सत्ताधारी संचालक व प्राचार्य यांच्यात शाब्दिक वाद झाला. कार्याध्यक्षांनी प्राचार्य पाटील यांना निलंबित करू, असा इशारा दिल्याचे सांगण्यात आले. या चोरीप्रकरणी प्राचार्यांनी पाच जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने तयार केलेला प्राथमिक अहवालही सभेत वाचण्यात आला. त्यावरूनही सभेत वादंग झाला.
पत्रकार परिषद
सभेनंतर कार्याध्यक्ष गोविंद मुंदडे, अध्यक्ष गुलबीरसिंग कालरा यांनी सभेत घेतलेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. त्यात क्रीडा साहित्य चोरीचा आरोप असलेले प्रा.अमृत अग्रवाल यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्यात आली. कालरा हे समितीचे अध्यक्ष असतील. ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. 
शाळा समितीवरून तिघे पायउतार
विरोधी गटातील तीन संचालकांकडे शाळा समितीचे चेअरमनपद होते. त्यांच्याविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्याने, त्यांना शाळा समितीच्या चेअरमन पदावरून पायउतार करण्यात आले. यात माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील, बजरंग अग्रवाल, दिलीप जैन यांचा समावेश असल्याचे कालरा यांनी सांगितले.
कार्यउपाध्यक्षही पायउतार
दरम्यान, खा.शि.चे कार्यउपाध्यक्ष बजरंग अग्रवाल यांनाही पदावरून पायउतार करण्यात आले. त्यांच्या जागी डॉ.अनिल शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 
यासंदर्भात प्रा. अमृत अग्रवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 
विरोधकांच्या तीव्र आक्रमकतेपुढे नाइलाज म्हणून खा.शि.च्या सत्ताधार्‍यांनी चोर प्राध्यापकास निलंबित केले. हे प्रकरण उघडकीस आणणार्‍या प्राचार्यांकडे आता कार्याध्यक्ष व सत्ताधारी संचालक आकसाने बघत आहेत. त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा प्रयत्न आहे. याला माझा, बजरंग अग्रवाल, दिलीप जैन यांचा विरोध आहे. प्राचार्यांना धक्का देण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
-डॉ. बी.एस.पाटील, संचालक, खा.शि. मंडळ 
 
डोळ्यासमोर ज्या चुकीच्या घटना घडतील त्या थांबवणारच. कोणाच्याही दबावाला बळी न पडता, माझे काम मी करत राहणार आहे. - डॉ.एल.ए.पाटील, प्रताप महाविद्यालय, अमळनेर नवीन नियुक्त समिती योग्य 
 
निवाडा करेल.ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल सादर करेल. प्राचार्य अथवा संचालकांना निलंबित केलेले नाही. -गोविंद मुंदडे, कार्याध्यक्ष, खा.शि.मंडळ