जळगावात दुचाकीच्या धडकेत प्राध्यापिका जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 12:49 IST2017-07-23T12:49:55+5:302017-07-23T12:49:55+5:30

हा अपघात रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगावातील काव्यरत्नावली चौकात घडला.

Professor injured in a wheelchair in Jalgaon | जळगावात दुचाकीच्या धडकेत प्राध्यापिका जखमी

जळगावात दुचाकीच्या धडकेत प्राध्यापिका जखमी

लाईन लोकमतजळगाव, दि. 23 - दुचाकीवर घराकडे परतणा:या प्रा. रेखा मुजूमदार (रा. मू.जे. महाविद्यालय परिसर) यांना दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या. हा अपघात रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगावातील काव्यरत्नावली चौकात घडला. मू.जे. महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या रेखा मुजूमदार या आपल्या दुचाकीवर महाबळ परिसराकडून घराकडे जात होत्या. त्यावेळी काव्यरत्नावली चौकात एका दुचाकीस्वाराने मुजूमदार यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्या जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Professor injured in a wheelchair in Jalgaon