शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ११ सावकारांविरुद्ध कारवाईसाठी चालढकल! पाच महिने उलटूनही फौजदारी कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 19:36 IST

...त्यामुळे ही ‘बोट दाखवा’ मोहिम सावकारांच्या पथ्थ्यावर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कुंदन पाटील - जळगाव : रावेर, यावल तालुक्यातील ११ सावकारांनी बळकावलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळाल्या. जिल्हा उपनिबंधकांच्या या कारवाईनंतर प्रशासनाचा गौरवही झाला. मात्र या सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी उपनिबंधकांनी तक्रार द्यावी, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होणार असून त्याठी पोलीस अधीक्षकांना पत्र देणार असल्याची भूमिका उपनिबंधकांनी घेतली आहे. त्यामुळे ही ‘बोट दाखवा’ मोहिम सावकारांच्या पथ्थ्यावर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नंदकुमार मुकूंदा पाटील, मधुकर तुकाराम राणे, सुदाम तुकाराम राणे, मुरलीधर सुदाम राणे, मालती मधुकर राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशिनाथ राणे, मधुकर वामन चौधरी, श्रीधर गोपाळ पाटील, देवानंद नामदेव बढे व सुधाकर मुकूंदा पाटील असे या सावकारांचे नाव आहे. या सावकारांनी रावेर, यावल तालुक्यातील १६ शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्या होत्या. त्यानंतर पीडित शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती.त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पुरावे, दस्ताऐवजांकरवी सुनावणी केली. त्यानुसार दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी या सर्वच प्रकरणांचा निवाडा केला. त्यानुसार सावकारांनी बळकावलेल्या शेतजमीनी परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना जमीनी परतही मिळाल्या. मात्र या सावकारांविरोधात  मात्र कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे सहकार विभागाच्या भूमिकेविषयी अनेकांनी आता नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

पोलीस म्हणतात.... -दरम्यान, नीलेश धनसिंग पाटील (दुसखेडा ता.रावेर) या शेतकऱ्याने सावदा पोलिसात सावकारांविरोधात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्यांना लेखी स्वरुपात समजपत्र दिले. या समजपत्रातील तपशीलनुसार महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये जिल्हा उपनिबंधक यांनी तक्रार दाखल करणे उचीत आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क साधावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. त्यानंतर संबंधिताने जिल्हा उपनिबंधकांकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला. मात्र पाच महिने उलटल्यावरही गुन्हा दाखल झालेला नाही.

कायद्यानुसार जमीनी परत करण्याचे अधिकार आहेत. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करावेत, यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले जाणार आहे.-संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस