पहूर येथे २१ हजार लीटर दूध संकलन करणाऱ्या शेतकऱ्याला २१ हजारांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:54 IST2021-03-19T15:53:57+5:302021-03-19T15:54:39+5:30
संघाचा नावीण्यपूर्ण उपक्रम : दूध उत्पादकांना प्रोत्साहन

पहूर येथे २१ हजार लीटर दूध संकलन करणाऱ्या शेतकऱ्याला २१ हजारांचे बक्षीस
पहूर, ता.जामनेर : पहूर पेठमधील शेतकरी कैलास भानुदास पाटील यांचा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी म्हणून गजानन सहकारी दूध उत्पादक पहूर संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. २१ हजारांचे रोख बक्षीस दिले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
गजानन सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने २१ हजार लीटर दूध संकलन करण्यासाठी नावीण्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत प्रोत्साहनासाठी ज्या शेतकऱ्याकडून २१ हजार लीटर दूध संघात संकलित करण्यात येणार, त्याला रोख २१ हजारांचे बक्षीस देण्याचा निर्णय संघाने घेतला. पेठमधील कैलास भानुदास पाटील यांनी २१ हजार ५०० लीटर दूध संकलित करून या उपक्रमाचे पहूरसह परिसरातून पहिले मानकरी ठरले.
यावेळी संस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रदीप लोढा यांनी कैलास पाटील यांना रोख २१ हजार व शाल, श्रीफळ देऊन गौरव केला.
याप्रसंगी राँष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष राजू जेन्टलमँन, पेठ वि.का. संस्थेचे माजी चेअरमन गोकुळ कुमावत, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष अशोक देशमुख, व्यवस्थापक सुभाष पाटील, शेख मिनाज, शिवाजी पाटील, गणेश पाटील, विजय पाटील, कैलास पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. गजानन सहकारी दूध संघाचे चेअरमन भास्कर पाटील यांनी शेतकऱ्यांना उर्जा व बळ देण्यासाठी घेतल्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.