जळगाव : लग्नानंतर प्रेयसीने नांदवयास येण्यास नकार दिल्याने निलेश मधुकर सपकाळे (२२, रा.रायसोनी नगर, जळगाव) या प्रियकर तरुणाने राहत्या घरात बेडशीडने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निलेश सपकाळे याचे रामानंद नगर परिसरातील एका तरुणीशी सहा वर्षापासून प्रेमप्रकरण होते. काही महिन्यापूर्वी दोघांनी पुण्यात विवाह केला होता. हा प्रकार काही दिवसांनी तरुणीच्या कुटुंबियांना समजला. त्यामुळे त्यांनी या लग्नास विरोध केला. लग्नानंतर आपण वेगळे राहू असे दोघांमध्ये ठरल्याने निलेश याने गेल्या महिन्यातच रायसोनी नगरात भाड्याने घर घेतले. काही ना काही कारण सांगून तरुणी घरी येणे टाळत होती. लग्नानंतर स्वतंत्र घर घेऊनही तरुणी नांदायला का येत नाही म्हणून निलेश, त्याचे आई, वडील व भाऊ असे संपूर्ण कुटुंब मंगळवारी तरुणीच्या घरी गेले. तेथे आम्ही दोघांनी लग्न केले असून पत्नीला माझ्यासोबत घरी पाठवा असे निलेश याने तरुणीच्या कुटुंबियाला सांगितले, मात्र तेव्हा तरुणीनेच मला यायचे नाही.तु मला विसरुन जा असे सांगून स्पष्टपणे नांदावयास येण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात येऊन निलेश याने आत्महत्या केली. निलेश हा कॅफेवर कामाला होता. वडील महापालिकेत नोकरीत आहेत. पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.
प्रेयसीने लग्नानंतर नांदण्यास नकार दिल्याने प्रियकराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:07 IST
लग्नानंतर प्रेयसीने नांदवयास येण्यास नकार दिल्याने निलेश मधुकर सपकाळे (२२, रा.रायसोनी नगर, जळगाव) या प्रियकर तरुणाने राहत्या घरात बेडशीडने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेयसीने लग्नानंतर नांदण्यास नकार दिल्याने प्रियकराची आत्महत्या
ठळक मुद्दे रायसोनी नगरात घेतला गळफास लग्नास होता तरुणीच्या कुटुंबियांचा विरोध