कारागृहातील कैद्याचा रुग्णालयात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 23:26 IST2021-01-05T23:26:38+5:302021-01-05T23:26:47+5:30

कैद्यावर पॉस्को अंतर्गत दाखल होता गुन्हा

Prisoner died in hospital in jalgaon | कारागृहातील कैद्याचा रुग्णालयात मृत्यू

कारागृहातील कैद्याचा रुग्णालयात मृत्यू

जळगाव : बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या रघुनाथ लोटू इंगळे( 59) या बंद्याचा मंगळवारी दुपारी चार वाजता गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला. रघुनाथ इंगळे यांच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत होता. कारागृहात असतांना एक जानेवारी रोजी त्याची प्रकृती बिघडल्याने कारागृह प्रशासनाने त्याला साकेगाव येथील गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते मंगळवारी उपचार सुरू असतांना चार वाजता मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याबाबतची खबर देण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी मयताचा पंचनामा करून संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेतली. बुधवारी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Prisoner died in hospital in jalgaon