एरंडोल (जि.जळगाव) : शाळा तपासणीचा शेरा चांगला मिळावा, यासाठी शिक्षकाकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पिंपळकोठा ता. एरंडोल येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी शाळेतच ही कारवाई करण्यात आली.
बळीराम सुभाष सोनवणे, (५५,) असे या अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे तर जे. डी. पाटील असे संशयित शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.