एचआयव्ही निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST2021-01-08T04:48:00+5:302021-01-08T04:48:00+5:30

जळगाव : वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक घटकाने ‘मिशन मोड’मध्ये काम केले तर रुग्णालय हे सुजलाम सुफलाम होईल, त्यासाठी आपले महाविद्यालय ...

Pride of staff working for HIV eradication | एचआयव्ही निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

एचआयव्ही निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

जळगाव : वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक घटकाने ‘मिशन मोड’मध्ये काम केले तर रुग्णालय हे सुजलाम सुफलाम होईल, त्यासाठी आपले महाविद्यालय व रुग्णालय हे राज्यभरात आदर्श होऊ शकते. प्रत्येकाने आपल्या कामात झोकून देऊन काम केले तर आपण नक्कीच यशाची भरारी घेऊ शकतो, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

येथील जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जिल्हाभरात ज्यांनी एचआयव्ही नियंत्रण व प्रतिबंधासाठी उत्तम कार्य केले त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन बुधवारी ६ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक एड्स दिन २०२० च्या निमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांच्या मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागतिक एड्स दिनानिमित्ताने ऑनलाइन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, कार्यक्रम व्यवस्थापक नीरज महाजन, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी प्रमोद बोराखेडे उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील २३ आयसीटीसी, समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एआरटी केंद्र, डीएसआरसी केंद्र यांना गौरविण्यात आले. प्रसंगी प्रस्तावनेत जिल्हातील एचआयव्ही कार्यक्रमाविषयी संजय पहूरकर यांनी माहिती सांगितली.

या कार्यक्रमासाठी गिरीश गडे, शुभांगी पाटील, मोजीन खान, रूपाली दीक्षित, प्रशांत पाटील, सुवर्णा साळुंखे, मनीषा वानखेडे, उज्ज्वला पगारे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Pride of staff working for HIV eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.