दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना राष्ट्रपती पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:52 AM2020-01-27T11:52:50+5:302020-01-27T11:53:11+5:30

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील दोन सहायक पोलीस निरीक्षकांना राष्टÑपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात स्थानिक गुन्हे शाखेतील ...

Presidential Medal to Two Assistant Police Inspectors | दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना राष्ट्रपती पदक

दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना राष्ट्रपती पदक

googlenewsNext

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील दोन सहायक पोलीस निरीक्षकांना राष्टÑपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात स्थानिक गुन्हे शाखेतील चंद्रकांत भगवान पाटील व मोटार परिवहन विभागातील भिकन गोविंदा सोनार यांचा समावेश आहे.
यासोबत जळगाव जिल्हा पोलीस दलातील तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी व नंदकुमार ठाकूर यांना देखील राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
चंद्रकांत पाटील यांची ३२ वर्षे सेवा झाली आहे त्यांना ५०० पुरस्कार मिळाले आहेत. ते १९८८ मध्ये पोलीस दलात भरती झाले़ त्यात त्यांनी पोलीस मुख्यालय, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा, जिल्हापेठ, पाचोरा, स्थानिक गुन्हे शाखा, संगणक विभाग आदी ठिकाणी सेवा दिली आहे़
राज्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचणाऱ्या आणि पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या एकाला जळगावातून अटक करण्यात आली होती़ त्या मोहिमेत पाटील यांचा सहभाग होता़

Web Title: Presidential Medal to Two Assistant Police Inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.