आरोग्य सेविका प्रेमलता पाटील यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:13+5:302021-09-17T04:21:13+5:30
जळगाव : जळगाव खुर्द उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका प्रेमलता पाटील यांचा बुधवारी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने ऑनलाइन सोहळ्यात राष्ट्रपती ...

आरोग्य सेविका प्रेमलता पाटील यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
जळगाव : जळगाव खुर्द उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका प्रेमलता पाटील यांचा बुधवारी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने ऑनलाइन सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जानेवारी महिन्यात प्रेमलता पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
मुंबई येथे एनआयसी येथे हा सोहळा ऑनलाइन पार पडला. प्रेमलता पाटील यांनी आदिवासी भागात, तसेच विविध आरोग्य केंद्रांमध्ये दिलेल्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत राज्यातून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासह गडचिरोली येथील आरोग्य सेविकेचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. २००६ ते १३ पर्यंत त्यांनी साक्री येथील आदिवासी पाड्यावर सेवा बाजावून लसीकरण, माता बालसंगोपन राष्ट्रीय कार्यक्रम, पोषण आहाराबाबत दक्षता आदींबाबत उत्कृष्ट कार्य केले. कुटुंबापासून दूर राहून त्यांनी ही सेवा केल्याने याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.