समुदाय आरोग्य अधिकारी संघटना अध्यक्षपदी डॉ. अमोल रावते बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST2021-07-03T04:12:27+5:302021-07-03T04:12:27+5:30

यावल : महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी जळगाव जिल्ह्यातील यावल येथील डॉ. अमोल गणेश रावते ...

As the President of the Community Health Officers Association, Dr. Amol Rawate unopposed | समुदाय आरोग्य अधिकारी संघटना अध्यक्षपदी डॉ. अमोल रावते बिनविरोध

समुदाय आरोग्य अधिकारी संघटना अध्यक्षपदी डॉ. अमोल रावते बिनविरोध

यावल : महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी जळगाव जिल्ह्यातील यावल येथील डॉ. अमोल गणेश रावते यांची राज्यातील सर्व जिल्हे तथा सहा विभागांतून सर्वांच्या सहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली.

राज्यामधील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेची राज्य कार्यकारिणी जाहीर केली.

अध्यक्ष- नाशिक विभागातून डॉ. अमोल गणेश रावते (जळगाव), उपाध्यक्ष अमरावती विभागातून डॉ. अजय अहिरकर (वाशिम), कार्याध्यक्ष औरंगाबाद विभागातून डॉ. गणेश शिंदे (औरंगाबाद), महासचिव पुणे विभागातून अश्रफ अली शेख (कोल्हापूर), सचिव कोकण विभागातून डॉ. अभिषेक नागरगोजे (रत्नागिरी), नाशिक विभागातून डॉ. संकेत पोटे (अहमदनगर), कोषाध्यक्ष नागपूर विभागातून डॉ. संदीप तिडके (भंडारा) यांची निवड झाली. तसेच विविध पदांसाठी कार्यकारिणी तयार केली.

संघटना तयार करण्यासाठी डॉ. शील दुधे (चंद्रपूर), डॉ. संदीप लेकुरवार (वर्धा) यांनी परिश्रम घेतले. तसेच डॉ. संग्राम शिंदे (कोल्हापूर) यांचे सहकार्य लाभले.

भुसावळचे माजी नगराध्यक्ष विजय चौधरी, राष्ट्रवादीचे माजी शहरप्रमुख दीपक पाटील, गोपाल चौधरी, प्रमोद चौधरी, राज चौधरी यांनी निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: As the President of the Community Health Officers Association, Dr. Amol Rawate unopposed