गर्भवती महिलेला सर्पदंश, रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू
By विवेक चांदुरकर | Updated: August 9, 2023 15:10 IST2023-08-09T15:07:52+5:302023-08-09T15:10:08+5:30
हनवतखेड येथील घटना

गर्भवती महिलेला सर्पदंश, रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू
जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील हनवतखेड येथे सर्पदंशामुळे २२ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना हनवतखेड येथे ९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
हनवतखेड येथील फुलाबाई सुनील डावर घरात काम करत असताना विषारी सापाने दंश केला. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेत महिलेच्या गर्भात असलेल्या चार महिन्यांच्या अर्भकाचासुद्धा मृत्यू झाला.