देशाची प्रगती, चांगल्या पावसासाठी जळगावात बोहरी बांधवांतर्फे प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:17 IST2018-06-14T22:17:06+5:302018-06-14T22:17:06+5:30
बोहरी समाज बांधवांतर्फे १४ रोजी ईद उत्साहात साजरी करण्यात येऊन देशाची प्रगती होण्यासह सर्वांचे आरोग्य चांगले राहावे तसेच चांगला पाऊस व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली.

देशाची प्रगती, चांगल्या पावसासाठी जळगावात बोहरी बांधवांतर्फे प्रार्थना
जळगाव : बोहरी समाज बांधवांतर्फे १४ रोजी ईद उत्साहात साजरी करण्यात येऊन देशाची प्रगती होण्यासह सर्वांचे आरोग्य चांगले राहावे तसेच चांगला पाऊस व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली.
ईदनिमित्त गुरुवारी सकाळी भवानी पेठेतील जैनी मशिद व शिवाजी नगरातील हुसामी मशिद येथे बोहरी समाज बांधवांनी ईदची नमाज अदा केली. त्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. बोहरा समाजाचे धर्मगुरु सैय्यदना मुफद्दल सैफूद्दीन साहेब (त.ऊ.स.) यांच्या मार्गदर्शनातून जगभरातील बोहरा बांधवांच्या प्रगतीसाठीही प्रार्थना करण्यात आली. ईदनिमित्त अबालवृद्धांनी नवीन कपडे परिधान करीत मशिदीमध्ये एकत्र आले व सर्वांनी नमाज पठण केले.