बेपत्ता नागरिकाचे वाचले प्राण
By Admin | Updated: January 16, 2017 00:19 IST2017-01-16T00:19:44+5:302017-01-16T00:19:44+5:30
अमळनेर : उपनगराध्यक्ष लांबोळेंची सतर्कता

बेपत्ता नागरिकाचे वाचले प्राण
अमळनेर : शहरातील रुबजीनगर भागातील बेपत्ता इसमाचे प्राण उपनगराध्यक्षांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत.
येथील लक्ष्मण दलपत जाधव (75) हे 12 जानेवारीपासून घरातून निघून गेले होते. घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेऊनही ते आढळून आले नव्हते. भुकेल्या अवस्थेत गलितगात्र झालेले जाधव कडाक्याच्या थंडीत अधिकच अशक्त झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून ते शेतात थांबून होते.
सखाराम न्हावी यांना ते आढळून आल्याने त्यांनी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांना कळवले.
त्यांनी ताबडतोब 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मागवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम. पाटील यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केल्याने लक्ष्मण जाधव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांचे प्राण वाचल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)