जामनेर येथे बंजारा समाजाकडून गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:34 IST2019-08-17T16:33:51+5:302019-08-17T16:34:19+5:30

स्कॅपल फाउंडेशन गोरबंजारा आयोजित विधार्थी गुणगौरव तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Praise from the Banjara community at Jamner | जामनेर येथे बंजारा समाजाकडून गुणगौरव

जामनेर येथे बंजारा समाजाकडून गुणगौरव

जामनेर, जि.जळगाव : येथील स्कॅपल फाउंडेशन गोरबंजारा आयोजित विधार्थी गुणगौरव तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सुरुवातीला संत सेवालाल महाराज, लक्ष्मण चैतन्य बापू व हरीत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन एस.चव्हाण, सुभाष जाधव, डी.सी. राठोड (मुंबई), नामदेव चव्हाण, सुमित चव्हाण, डॉ.श्याम चव्हाण, लालचंद चव्हाण, राधा संतोष राठोड, हेमलता चव्हाण, स्मिता चव्हाण, मोरसिंग राठोड, कांतिलाल नाईक, आत्माराम जाधव, लखुसिंग नाईक, मोरसिंग राठोड, मदन जाधव व समाज बांधव उपस्थित होते.
तालुक्यातील सुमारे ५५ विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सुमारे ५३ सामाजिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया मान्यवरांचादेखील पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Web Title: Praise from the Banjara community at Jamner