स्मशानभूमीतच केली प्राैढाने आत्महत्या, शिरसोलीतील घटना

By विलास.बारी | Updated: June 29, 2023 23:10 IST2023-06-29T23:10:46+5:302023-06-29T23:10:58+5:30

शिरसोली येथील संजय हरी पाटील हा ट्रक चालक होता.

Praidha committed suicide in the graveyard, the incident in Shirsoli | स्मशानभूमीतच केली प्राैढाने आत्महत्या, शिरसोलीतील घटना

स्मशानभूमीतच केली प्राैढाने आत्महत्या, शिरसोलीतील घटना

जळगाव : येथील संजय हरी पाटील (वय ४०) या प्रौढाने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्मशानभूमीत आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी सात वाजेच्या उघड झाली.

शिरसोली येथील संजय हरी पाटील हा ट्रक चालक होता. संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्याने पत्नी व भावांना शिर्डी येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र तो शिर्डीला न जाता शिरसोली गावातील स्मशानभूमीच्या शेंडमध्ये आला.

याठिकाणी शर्टच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब गावातील गोलू पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिस पाटील शरद पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. संजय यांच्यावर ३० रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Praidha committed suicide in the graveyard, the incident in Shirsoli