चाळीसगावला प्रदीप देशमुख यांचे अभीष्टचिंतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:25+5:302021-08-19T04:22:25+5:30
चाळीसगाव : गेल्या ४० वर्षांपासून येथील सहकार क्षेत्रात मोठे योगदान देणारे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष व चाळीसगाव बाजार समितीचे ...

चाळीसगावला प्रदीप देशमुख यांचे अभीष्टचिंतन
चाळीसगाव : गेल्या ४० वर्षांपासून येथील सहकार क्षेत्रात मोठे योगदान देणारे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष व चाळीसगाव बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले.
कोरोना महामारी, तालुक्यावर असणारे दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन प्रदीप देशमुख यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. सकाळी त्यांचे राहत्या घरी कुटुंबीयांनी औक्षण केले. सहकार, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
देशमुख यांनी चाळीसगाव तालुक्यातील विविध सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रायोगिक काम केले आहे. जिल्हा बँकेतही ते संचालक म्हणून कार्यरत होते. सहकार क्षेत्र हे ग्रामीण उन्नत्तीचा स्रोत असून याद्वारे काम करता आले, याचे समाधान आहे. पुढेही काम करत राहू. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजीव देशमुख, जि. प. सदस्य अतुल देशमुख, माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख, बाजार समितीचे माजी उपसभापती जालम पाटील, जळगाव जिल्हा सचिव संघटनेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, प्रकाश देशमुख, वसंतराव देशमुख, पुरुषोत्तम सावंत, प्रदीप मोरे, कैलास जाधव, दीपक शितोळे, सिध्दार्थ देशमुख, परशुराम चौधरी, सतीश शिंदे, पप्पू चव्हाण, गोटू देशमुख आदी उपस्थित होते.