तीन तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 23:13 IST2021-01-24T23:12:01+5:302021-01-24T23:13:00+5:30
तांत्रिक बिघाड झाल्याने अमळनेर व पारोळा तालुक्याचा पूर्ण वीजपुरवठा बंद झाला आहे

तीन तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत
ठळक मुद्देअमळनेरच्या २२० के. व्ही. सबस्टेशनमध्ये बिघाड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : टाकरखेडा रस्त्यावरील २२० के व्ही सबस्टेशन च्या ८ व्या नंबरच्या टॉवर वर तांत्रिक बिघाड झाल्याने अमळनेर व पारोळा तालुक्याचा पूर्ण वीजपुरवठा बंद झाला आहे तर चोपडा तालुक्याच्या काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
धुळे येथील एएचव्ही पथक दुरुस्तीसाठी रवाना झाले असून चार तास दुरुस्तीसाठी लागणार आहे, तोपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी दिली.