अवैध गुटख्यासंदर्भात पोलिसांना गुन्हे नोंदविण्याचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 11:59 AM2020-08-03T11:59:09+5:302020-08-03T11:59:27+5:30

जळगाव : गुटखा, पान मसाला,सुगंधित तंबाखु, सुपारी, खर्रा व मावा या प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या बंदीची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना ...

Power to register offenses with police regarding illegal gutkha | अवैध गुटख्यासंदर्भात पोलिसांना गुन्हे नोंदविण्याचे अधिकार

अवैध गुटख्यासंदर्भात पोलिसांना गुन्हे नोंदविण्याचे अधिकार

Next

जळगाव : गुटखा, पान मसाला,सुगंधित तंबाखु, सुपारी, खर्रा व मावा या प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या बंदीची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना आता अधिकार देण्यात आले असून अन्न व औषध विभागाची परवानगी घेण्याची गरज नाही. पोलीस थेट गुन्हा नोंदवू शकतात, याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांनी काढले प्रत्येक पोलीस अधीक्षक व आयुक्तांना त्याची प्रत पाठविण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी पोलीस दलाला विनंती केली असून अन्न सुरक्षा अधिकारी यांचा प्रतिबंधीत अन्न पदार्थ प्रकरणी दिलेला भादवि कलम १८८, २७२, २७३ व ३२८ अंतर्गत प्रथम खबरी अहवाल दाखल करुन घेण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना निर्देश देण्यात आलेले आहेत. यापूर्वी ५ फेबु्रवारी २०२० रोजी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात भादवि कलम १८८, २७२, २७३ व ३२८ पोलिसांना स्वतंत्र कारवाईचे अधिकार प्रदान करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना आता अन्न व औषध प्रशासन विभागाला सोबत न घेताही कारवाई करता येणार आहे. दरम्यान, अन्न व औषध विभागाने कारवाई करावयची झाल्यास पोलीस बंदोबस्ताची मागणी केली तर पोलिसांना बंदोबस्त पुरवावा लागणार आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे (कायदा व सुव्यवस्था) यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी झालेले आहेत.
एफडीएचा ताण कमी होणार
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नेहमीच मनुष्यबळाच्या नावाखाली कारवाया कमी होत असल्याचे सांगितले जात होते, आता थेट पोलिसांनाच अधिकार प्राप्त झाल्याने या विभागाचा ताण कमी झाला आहे.
 

Web Title: Power to register offenses with police regarding illegal gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.