पहूर कसबेत भाजपच्या अण्णा फॅक्टरची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:21 IST2021-01-18T13:18:46+5:302021-01-18T13:21:40+5:30
पहूर कसबे येथे भाजपच्या अण्णा फॅक्टरने तीस वर्षाची सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.

पहूर कसबेत भाजपच्या अण्णा फॅक्टरची सत्ता
ठळक मुद्देकासाेद्यात दोन वाॅर्डचे निकाल जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
कासोदा, ता. एरंडोल : पहूर कसबे ग्रामपंचायतीवर भाजपच्या अण्णा फॅक्टरने ९ जागा जिंकत वर्चस्व स्थापन केले. गेली तीस वर्षाची सत्ता भाजपने आपल्याकडेच ठेवली आहे.
या ग्रामपंचायतीत भाजपला ९, महाविकास आघाडीला ६ तर दोन अपक्षांना मिळाल्या आहेत.
कासोदा येथे प्रभाग क्रमांक १ मधून नरेश ठाकरे, प्रशांत पारधी, निर्मलाबाई क्षिरसागर हे भाजप समर्थक विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये मावळत्या सरपंच मंगलाबाई राक्षे विजयी झाल्या आहेत. राक्षे या अपक्ष आहेत. मावळते सदस्य महेश पांडे (शिवसेना), आकांक्षा बियाणी (शिवसेना) विजयी झाल्या आहेत.