पीपल्स बँकेची निवडणूक स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:00+5:302021-04-06T04:16:00+5:30
रेशन दुकानावर बायोमेट्रिक रद्द करा जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता स्वस्त धान्य दुकानांवरील बायोमेट्रिक प्रणाली रद्द करावी, ...

पीपल्स बँकेची निवडणूक स्थगित करा
रेशन दुकानावर बायोमेट्रिक रद्द करा
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता स्वस्त धान्य दुकानांवरील बायोमेट्रिक प्रणाली रद्द करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) करण्यात आली आहे. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक प्रणाली तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली आहे. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानावरील बायोमेट्रिक रद्द करण्यात यावे. निवेदन देताना महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, प्रताप बनसोडे, नरेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
गर्दीवर नियंत्रण आवश्यक
जळगाव : उपाययोजनांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, भाजीपाला विक्री सुरूच राहणार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे येथील गर्दीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली जात आहे.
बैठकांवेळी वाढती गर्दी चिंताजनक
जळगाव : सध्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असून कोरोना उपाययोजनांसाठी आयोजित बैठकीला लोकप्रतिनिधींसह त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने संसर्गाची भीती अधिक बळावल्याचे चित्र सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले.
सिग्नल बंद
जळगाव : शहरातील विविध चौकांतील सिग्नल बंद असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. आकाशवाणी चौकात नेहमी वर्दळ असली तरी या ठिकाणचे सिग्नल संध्याकाळी देखील बंद असतात. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.