शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

पोपटा, पोपटा, बोलतोस गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:12 AM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ललित लिहिताहेत साहित्यिक माया दिलीप धुप्पड...

घारीची आकाशातली, पंख पसरून संथ गतीची भरारी मनाची सखोलता वाढवते़ समुद्रावरून उडणारे पक्षी पाहिले की असं वाटतं विशाल समुद्र पार करेपर्यंत त्यांच्या पंखात बळ आणि मनात आत्मविश्वास कोण देतं? किती शिकावं या पक्ष्यांकडून? बगळ्यांची आकाशातली समूह कवायत आणि हजारो लहान काळ्या पक्ष्यांची आकाशातील संघ कवायत, करामती पाहून आनंद तर होतोच पण यांना मिल्ट्रीची शिस्त कुणी शिकवली, असा प्रश्न मनात उभा राहतो़ इथ इथ बस रे मोरापासून बालपण सुरू होतं़ त्या गाण्यातला आणि पुस्तकातला सुंदर मोरापासून बालपण सुरू होतं़ त्या गाण्यातला आणि पुस्तकातला सुंदर मोर व्हॉटस्अ‍ॅपवर येऊन त्यांच्या नजाकती दाखवतो़ ते पहायलाही आवडतं मग नांदेड हे पोपटांचा हिरवा रंग ल्यालेलं हिरवं शहर आणि स्टेशनवर हिरव्या झाडांवर मला हिरव्या हज्जारो पोपटांचं झालेलं दर्शऩ ते क्षण मनाच्या भूमीवर हज्जारो घरे करून राहिले आहेत़ हज्जारो घरे? हो, हज्जारो घरे, कारण मनाच्या जागेला प्लॉटचे भाव नसतात़बालकवितांमध्ये पोपटाची चोच बोलत असते़ मिट्ठू मिठ्ठू पोपट, बोलतोस गोड, देवू का तुला पेरुची फोड?मंगेश पाडगावकर एका कवितेत म्हणतात,एक होता पोपटतो आईला म्हणाला,तू मला थोपटया पोपटांना तर अंगाई गाऊन थोपटवायला कुणी नव्हतं, पण हे पोपट मात्र माझ्या मनात अंगाई गीतापासून सर्व गाणी गात होते़आम्ही झाडांकडे पाहतोय़ फोटो काढतोय म्हणून आजूबाजुची माणसेही झाडांकडे पाहू लागली़ त्या अगोदरही कुणी पाहिलं असेलच, पण आयुष्याच्या कोलाहलात सगळ्यांचं लक्ष निसर्गाकडे नाही जात़ स्वत:च्या तंद्रीत, सुख-दु:खात व्यथा-वेदनेत आणि घाईगडबडीत असणारा माणूस ‘निसर्ग’ जवळ येवूनही त्याचा आनंद घेऊ शकत नाही़पण शांता शेळके मात्र जगाचा ताप विसरायला आंब्याच्या झाडाच्या घनदाट छायेखाली जातात़त्याची सावली त्यांना ‘प्रेमळ’ वाटते़ ‘इथे’ या कवितेत त्या म्हणतात़,शांतविले मी तप्त जीवाला इथे कितीदातरीकितीदा यावे तरी येथली अवीट ही माधुरीमी जळगावला आल्यावर चर्चासत्राचे आयोजक, विद्यापीठातील प्रा़डॉ़पृथ्वीराज तौर यांना फोन केला होता़ ‘सर, नांदेडमध्ये गावात कुठे पोपट जास्त संख्येने दिसतात का?’ सर म्हणाले, ‘नाही, गावात नाही़ पण रेल्वेस्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर एकजवळ भरपूर झाडे आहेत़ त्या झाडांवर संध्याकाळपासून शेकडो बगळे येऊन बसतात़ ते झाडाच्या आत नाही तर झाडांवर जणू शेंड्यांवर बसतात़ ही हिरवी झाडे पांढरी होतात़’वा किती छान, निसर्गाचा हा लोभसवाणा अविष्कार आणि त्यात सामील होणं ही माणसाची नैसर्गिक ओढ अजूनही टिकून आहे हेच खरं,एका इंद्रधनुष्यातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं़़़ अशी अनेक इंद्रधनुष्ये आकाशात एकदम दिसली तर किती आनंद होईल? ते असंख्य पोपट पाहून मला तितकाच आनंद झाला़ मन पुढे पाय टाकायला तयार होईना़ पण सूर्योदय, सूर्यास्त, सूर्यास्त कितीही रम्य असले तरी तिथे किती वेळ थांबणार? मनाला मागे ठेवून पाय स्टेशनचा जीना चढू लागले़ त्या मनात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता़लहानपणी सुतारपक्षी दिसला की तो उडू नये म्हणून लांबून आम्ही खूप वेळ त्यांच्याकडे, त्याच्या लाकूड फोडणाºया चोचीकडे, डौलदार तुºयाकडे पाहात राहायचो़ आता तर फार क्वचित दिसतो सुतारपक्षी़ आशावाद रुजवणारी त्याची कविता इयत्ता सहावीला मी शिकवली आहे़ कवी वसंत सावंत यांची ‘सुतार पक्षी’ की कविता सुन्न आणि खिन्न झालेल्या मनाला हिरव्या पालवीने पालवून जाते़दूर सागाच्या झाडाला ढोल करीत सुतारत्याची जिद्द ताकद गेली सांगून अपारपक्षी उडताना त्याचा नखरा न्यारा असतो़ त्याच्या तºहा विलोभनीय असतात़ तो नजारा आपल्या नजरेला सुरेल दिशा देतो़ शाळेमध्ये परस बागेतली झाडं वर्गातून दिसायची़ चिमण्या, साळुंक्या, कबुतर इ़सोबत एखादे वेळेस सारस पक्षी दिसायचा़ वर्गातल्या सगळ्या मुलामुलींना मी तो उडेपर्यंत पहायला लावायची़ उडताना तो आणि त्यांच्या अदा कमालीच्या सुंदर असायच्या़ वर्गातून ओ, वा, किती छानचे सूर भिंतीना जागं करायचे़ एका भिंतीवर चिऊताईचं घरटं होतं़ चिऊताईची चिवचिव ताल धरायची़पक्ष्यांचं नाजुकसं उडणं मनाला संवेदनशील बनवतं़ पक्ष्यांचं भारदस्त उडणं मनावरचा ‘भार’ हलका करतं़ पक्षी नेहमी आनंदाचं वाण देतात़, लहान मुलांना म्हणूनच आवडतात़ क्षणभर बसतात, क्षणात उडतात, किलबिल करतात़ बालकवी म्हणतात,क्षणभर येथे, क्षणभर तेथे भिंगोरी साचीअवकाशी जशी काय उडविले फिरकी जादुचीकिंवा पटकन उठे, पटकन बसे उंच भराºया घेत सुटेपक्ष्यांच्या हालचालींच्या गतिमानतेला सुंदरतेचा रंग असतो़ (उत्तरार्ध)-माया दिलीप धुप्पड, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव