निवडणुकीच्या वादातून जळगावात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:06 IST2018-08-04T14:04:24+5:302018-08-04T14:06:09+5:30
मनपा निवडणुकीत पैसे वाटपाच्या कारणावरुन वैभव अधिक पाटील व निलेश रोहिदास बडवे या दोघांना शुक्रवारी रात्री गोपाल सोनवणे व इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली.

निवडणुकीच्या वादातून जळगावात हाणामारी
जळगाव : मनपा निवडणुकीत पैसे वाटपाच्या कारणावरुन वैभव अधिक पाटील व निलेश रोहिदास बडवे या दोघांना शुक्रवारी रात्री गोपाल सोनवणे व इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेच्या उमेदवारासाठी पैसे वाटप केल्याच्या रागातून भरत सोनवणे, गणेश सोनवणे, भूषण सोनवणे व इतरांनी मारहाण केल्याचे वैभव याचे म्हणणे आह. तर आधी वैभव यानेच भरत सोनवणे याला मारहाण केली होती, आम्ही घरीच होतो, त्यामुळे मारहाणीचा प्रश्नच येत नाही, असे भूषण सोनवणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यातील काही जणांनी पोलिसांशीही हुज्जत घातली. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी जखमीची चौकशी केली.