शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Political : एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांच्या राजकीय वादात 'नवा व्हेरीयंट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 17:52 IST

Political : आमदार गिरीश महाजन यांना कोरोना, राजकीय व्हेरिएंटवर टोले - प्रतिटोल्यांना सुरुवात

ठळक मुद्देगेल्या महिन्यात बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाजन आणि खडसे यांच्यात अशी टोलेबाजी रंगली होती. आता कोरोनाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा ती रंगली आहे.

जामनेर जि. जळगाव : राज्याचे माजी मंत्री आणि  जामनेर येथील भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर   कोरोनाच्या राजकीय व्हेरिएंटवर  फटकेबाजी सुरु झाली आहे.  महाजन यांना मोक्का लागण्याच्या भीतीने कोरोनाची लागण  झाल्याचा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मारला आहे तर भविष्यात काय होणार याची चिंता करा, असा प्रतिटोला महाजन यांनी खडसे यांना मारला आहे.

गेल्या महिन्यात बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाजन आणि खडसे यांच्यात अशी टोलेबाजी रंगली होती. आता कोरोनाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा ती रंगली आहे. मुंबईत एका लग्न समारंभातून परतल्यानंतर महाजन यांना त्रास जाणवू लागला. तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ते जामनेर येथेच गृहविलगीकरणात आहेत.  त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आमदार महाजन यांनी केले आहे.  महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी जामनेर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे सर्व कार्यक्रम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडले.  

मोक्काच्या भीतीने महाजन यांना कोरोना : खडसे गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीतीपोटी  त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असावी,   असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजन यांना हाणला आहे.  गिरीश भाऊ,  लवकर बरे व्हावे त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे मी प्रार्थना करणार आहे असा चिमटा ही त्यांनी  काढला. शिरसाळा ता. बोदवड येथे पत्रकारांशी बोलतांना खडसे यांनी वरील टोलबाजी केली. 

एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे. ईडीची नोटीस मिळताच एका महिन्यात चार वेळेस कोरोनाचे खोटे सर्टिफीकेट त्यांनी मिळविले आहे. जावई सहा महिन्यापासून जेलमध्ये आहे. आपण जेलच्या उंबरठ्यावर आहात. गृहमंत्र्यांवर दबाव आणून माझेवर खोटा गुन्हा दाखल करवून घेतला. जनता सर्व जाणून आहे. भविष्यात काय होणार याची चिंता तुम्ही करा.    - गिरीश महाजन, आमदार 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या