जिल्ह्यातील ८८ टक्के बालकांना पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:28+5:302021-02-05T06:00:28+5:30
जळगाव : जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. ३००४ बुथवर ३८६९३६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. एकत्रित बालकांच्या ...

जिल्ह्यातील ८८ टक्के बालकांना पोलिओ डोस
जळगाव : जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. ३००४ बुथवर ३८६९३६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. एकत्रित बालकांच्या प्रमाणात ८८. ३ टक्के बालकांनी हे डोस घेतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली, यात ४३३०७४ बालकांना पोलिओ डोस देणे अपेक्षित होते. उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहे. जळगाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात बालकांना लस देण्यात आली. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांच्यासह आरोग्य यंत्रणेने नियोजन केले होते.
अशी झाली मोहीम
मनपा - २२३ बूथ, ३६३११ बालकांना डोस
ग्रामीण व शहरी मनपा वगळून- २७८१ बूथ, ३५०६२५ बालकांना डोस